रस्त्याचे नाव ठेवले करोना रोड


अहमदनगर बातमी: Ahmednagar News  खूप वर्षापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न लॉकडाऊनच्या काळात सुटल्यामुळे मांडवा  येथील गावकऱ्यांनी रस्त्याचे नाव चक्क ‘’ ठेवले आहे. या रस्त्यावर तशी पाटी देखील लावण्यात आली आहे. ‘करोना’ काळात हा रस्ता झाल्याची आठवण राहावी, यासाठी करोना रोड’ नाव ठेवण्याची संकल्पना गावातील एकाने मांडली, व त्यापद्धतीने रस्त्याचे नामकरणही करण्यात आले आहे. या निमित्ताने मात्र महाराष्ट्रातील नाही, तर देशातील करोना रोड’ असे नाव असणारा एकमेव रोड नगर जिल्ह्यात असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून करोनाने जगभर थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यात देशामध्येही करोनाबाधित वाढत असून दररोज सर्वाधिक कानावर पडणारा शब्द म्हणजे ‘करोना’. हा शब्द प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच उच्चारला असणार. ‘करोना’या शब्दाची अनेकांच्या मनामध्ये भिती देखील आहे. मात्र, मांडावा गावामध्ये चक्क काळात रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्या रस्त्याचे नावच ‘करोना रोड’ ठेवण्यात आले आहे. मांडवा गावापासून जवळच लक्ष्मीवाडी वस्ती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा, यासाठी गावातील काही मंडळी प्रयत्नही करीत होती. प्रत्यक्षात मात्र कोणी रस्त्यासाठी जागा देत नव्हते, तर कोणी काम सुरू करण्यास अडथळे आणत होते. परंतू लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वजण घरी सापडले, व त्यांची समजूत काढण्यात यश आले, आणि लोकसहभागातून लॉकडाऊनच्या काळातच रस्ताचे कामही पूर्ण झाले.