पहिले रुग्णसेवेला प्राधान्य ....



अहमदनगर बातमी:   राज्यात करोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना सरकारी कर्मचारीही तेवढीच मोलाची साथ देताना दिसत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी तर सुट्ट्याही घेतलेल्या नाहीत. तर काही कर्मचारी वैयक्तिक आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही हे दु:ख विसरून काम करताना दिसत आहेत. येथील बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे हे सुद्धा अशाच कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या सासऱ्याचं निधन झालेलं असतानाही त्यांनी सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला न जाता रुग्णसेवेला प्राधान्य दिलं आहे. मेजर देवदान कळकुंबे हे बूथ हॉस्पिटलचे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. द सॉल्व्हेशन आर्मी चालवित असलेल्या या बूथ हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पूर्वी दगडी दवाखाना म्हणून ओळखले जाणारे हे हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मेजर कळकुंबे यांचे सासरे प्रकाश पंडित यांचं ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे सोमवारी १८ मे रोजी निधन झाले