📚 "या" प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
Online application for "this" admission
या प्रवेश परीक्षेसाठी १ जूनपासून (सोमवार) ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख ३० जूनपर्यंत ठेवण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह देश, विदेशातील विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. विद्यापीठात पदव्युत्तर पदवी, पदवी, इंटिग्रेटेड कोर्स असे सुमारे ९० अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विभाग आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी १०० गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यात २० गुण हे सामान्य ज्ञानावर असतात. उर्वरित गुण अभ्यासक्रमाशी निगडीत विषयांवर असतात. असे त्या नमूद करण्यात आले आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp