🛢️ अ‍ॅसिड टँकरला गळती - तिघे बेशुद्ध


पुण्यातील चांदणी चौकाजवळ  टँकरमधून  अ‍ॅसिडची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गळती झाली. या गळतीमुळे त्याच्या वासाने तीन नागरिक बेशुद्ध पडले होते.

त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी( दि.२७) रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली होती.
💥 बालेवाडीतील कोविड 19 केंद्राची पाहणी
अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी मातीच्या सहाय्याने हा वास कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे  कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत थांबविण्यात आली आहे.
💁‍♂️ पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त कोण?
पनवेल येथून निघालेला सुमारे १५ ते २० हजार लिटर क्षमतेच्या अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडचा मोठा टँकर कात्रजच्या दिशेने जात असताना चांदणी चौक ओलांडून पुढे जात असताना कोथरूड वळणाजवळ टँकरला मोठे छिद्र पडून त्यातून अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची गळती सुरू झाली.
💥 पुणे शहरात ३१८ नवे रुग्ण
हे अ‍ॅसिड बाहेर रस्त्यावर पडून घट्ट होत होतो आणि मोठ्या प्रमाणात वाफा निघत होत्या.त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर