हॉटस्पॉट परिसरातील जकात नाके बंद करा...




अहमदनगर बातमी
💫 नगर शहरालगत छावणी परिषदेचा सोलापूर नाका व स्टेट बँक चौक येथील नाका हॉटस्पॉट परिसरालगत येत असून तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे.

✨ सदरील मागणी भिंगार राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ आढाव यांनी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी व छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

💁‍♂️ *निवेदनात म्हंटले :*

⚡ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अविरत कार्यरत असून छावणी परिषद हद्दीत अद्याप एकही कोरोनाबाधित आढळला नाही.

👉 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हॉटस्पॉट परिसराच्या जवळील परिसर कोर परिसर हा बफर झोन म्हणून घोषित केला आहे.

✨ अशा परिसरांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र याच परिसरालगत असलेले छावणी हद्दीतील सर्व जकात नाके मात्र 18 मेपासून सुरु केले आहेत.   

📍  या जकात नाक्यांवरील कार्यरत असलेले कर्मचारी कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

📌 दरम्यान, हॉटस्पॉट परिसरालगत असणारे सर्व जकात नाके तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने दिले आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर