रेड झोन नसलेले सलून सुरु करण्यास परवानगी

credit toiimg

महाराष्ट्र  राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4थ्या नियामावलीत रेड झोन नसलेले सलून सुरु करण्यास परवानगी  दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दाढी-केस कापण्यासाठी वाट पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सलून सुरु केल्यानंतर मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे नियम आणि कोरोना संदर्भातील नियमाचे  पालन करणे सलून चालकांना बंधनकारक असणार आहे.

रेड झोन नसलेले सलून सुरु झाल्याने तेथील नागरिकांना वाढलेल्या दाढी-केस यांच्यापासून सुटका मिळणार आहे. सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distance) नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे सलून जरी सुरु झाले तरी कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक दाढी-केस कापण्यासाठी सलूनमध्ये जाणार का? हा मोठा प्रश्न आहे.
5G मुळे कोरोना होतो का ?
महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातही ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने तेथील कोरोनाच्या संसर्ग परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी सलून बंदच होते. मात्र लॉकडाऊन 4 मध्ये  आता कोणताही निर्णय घेताना स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
YouTube ने भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलं UPI पेमेंट फिचर
सलून बंद असल्याने सर्वसामन्यांपासून नेते मंडळी, सेलिब्रिटी सर्वांच्याच दाढी, केस वाढल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियावर( Social Medea) अनेकांनी घरीच दाढी, केस कापल्याचे व्हिडीओ देखील शेअर केले होते, तर काहींना दाढी केस वाढलेला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता, यामध्ये सेलब्रिटी, नेते मंडळी यांचाही समावेश होता.

गेल्या दोन महिन्यापासून सलून बंद असल्याने सलून व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काही संघटनानी अटी-शर्थींसह सलून उघडण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांना विनंती देखील केली होती.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर