💥 अल्पवयीन मुलीवर अत्याचार...



बीड । क्राईम बातम्या
लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना आनंदगाव येथे घडली.

एका सतरा वर्षीय मुलीवर गावातीलच २० वर्षीय तरूण सातत्याने अत्याचार करत असे, सदरील हा प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी पोलीसांनी जेरबंद केला असून घटना माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे घडली आहे.
💁‍♂️ पंकजा मुंडे : स्त्री-पुरुष समानतेचे दिवे लावा
आनंदगाव येथे २० वर्षीय शेख मुबारक शेख मुनसी हा गेल्या आठ महिन्यापासून गावातीलच १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करत असे.
💁‍♂️ करोना बाधित महिलेनं दिला जुळ्याना जन्म
त्यानुसार आरोपी शेख मुबारक याच्या विरोधात कलम ३७६ व बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात  आला.

दरम्यान, आरोपीला दिंद्रुड पोलीसांनी जेरबंद केले आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर