🤓 केळी घेताय ना मग वाचा


लहान मुलांपासून वृध्द व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आवडीचे, सहज मिळणारे, अनेक जीवनसत्वे व पोषण मूल्ये देणारे फळ म्हणजे केली. केली खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.  मात्र केळी खरेदी करताना काही खबरदारी नक्की घ्यायला हवी. त्यावर एक नजर...

1.केळे खरेदी करताना पूर्ण पिवळ्या रंगाचे आणि साल थोडी तजेलदार असेल असे घ्यावे.

2.सालीवर काळे डाग खूप प्रमाणात असतील तर अशी केळी चवीला गोड असतात पण ती लवकर खराब होतात.

3.आपण केळे कशासाठी घेत आहोत? एका दिवसात आपण किती केळी खाणार याचा अंदाज घेऊन केळी खरेदी करावी.

4.केळी खरेदी करताना जाडीला चांगली आणि मध्यम आकाराची खरेदी करणे उत्तम.

5.केळी लगेच पिकतात. अशी थोडी कच्ची केळी अधिक दिवस चांगली राहू शकतात.

6.स्वस्त आहेत म्हणून खूप केळी खरेदी करणे टाळा. अनेकदा अशी केळी दिवसभर सुद्धा टिकत नाहीत.