💥 अहमदनगर करोनामुळं बलात्कारातील आरोपी ७ वर्षांनंतर पकडले

Ahmednagar Karona rape accused caught after 7 years

अहमदनगर बातमी:
 गावातील एका महिलेवर बलात्कार करून फरार झालेला व पोलिसांना तब्बल सात वर्षे गुंगारा देणारा एक आरोपी अखेर करोनाच्या साथीमुळं पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. करोनाच्या साथीच्या भीतीनं तो मूळ गावी परतला आणि पकडला गेला. पांडुरंग य‌शवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून तो तालुक्यातील आहे. २०१३ मध्ये गावातील महिलेवर बलात्कार करून शहरात पळून गेला होता. 
💥 भारत टॉप दहा देशांच्या यादीत...
📌 शेंगा‌ळच्या विरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. ओळख लपवून राहत असल्यानं त्याला पकडण्यात नगरच्या पोलिसांना अद्याप यश आलं नव्हतं. करोनाची साथ आल्यानंतर पुण्या-मुंबईतील नागरिक गावाकडे परतत आहेत. साथीच्या आजाराला घाबरून शेंगाळही गावी परतला होता. संगमनेर तालुक्यातील शेंगाळवाडी परिसरातील डोंगराळ भागात तो राहत होता.
💇‍♂️अहमदनगर  क्वारंटाइन सेंटरमधील महिलेचे दागिने चोरीला
📌 इथंही तो खरं नाव आणि ओळख लपवून राहत होता. मात्र, तो गावी परतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं डोंगराळ भागात जाऊन त्याला पकडले. ग्रामस्थांच्या मदतीनं त्याची ओळख पटविण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला घारगा‌व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सात वर्षे तो कोणत्या शहरात लपून बसला होता याचाही तपास करण्यात येत आहे



🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर