cPanel मध्ये वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे ? Cpanel wordpress Install

cPanel म्हणजे नेमकं काय भावा ?


तर मग अपल्याला तेच शिकायचे आहे तर चला मग टॉपिक कडे

तर चला मग अपला पहुया  C** चानेल

थोडक्यात cPanel म्हणजे तुमची होस्टिंग मॅनेज करण्यासाठीचे एक पॅनल आहे. ज्यांना काहीच टेक्निकल माहिती नाही अशांना देखील या पॅनेलच्या मदतीने होस्टिंग मॅनेज करणे शक्य होते. यातून तुम्ही डोमेन DNS, SSL सर्टिफिकेट, डेटाबेस, मेल अकाउंट इत्यादी मॅनेज करू शकता.

वन-क्लिक वर्डप्रेस कसे इन्स्टॉल करावे ?

१. सर्वप्रथम तुमच्या होस्टिंग पॅनल मधून cPanel उघडा. शक्यतो तुमच्या डोमेनच्या शेवटी :2083 किंवा /cpanel टाकून उघडता येते. उदा. https://www.yourdomain.com:2083



२. जर तुम्हाला ज्या डोमेनवर वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे आहे, ते तुमचे प्रायमरी डोमेन असेल तर तुम्हाला पॅनलमध्ये डोमेन जोडण्याची आवश्यकता नाही. परंतु जर प्रायमरी डोमेन व्यतिरिक्त अजून डोमेन जोडायचे असल्यास आधी तुम्हाला ते Domain -> Addon Domain मध्ये जाऊन जोडावे लागेल. या डोमेनचे नेम सर्व्हर किंवा A रेकॉर्ड या होस्टिंगचेच असल्याची खात्री देखील करून घ्या.



३. आता वर्डप्रेस इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या cPanel मध्ये Software नावाचा एक पर्याय असेल. यात QuickInstall अथवा Softaculous Apps Installer असे पर्याय असतील. आता तुम्ही वापरात असलेल्या होस्टिंग कंपनीनुसार हे पर्याय थोडे बदलू शकता. खाली Hostgator आणि BlueHost च्या होस्टिंग मधील स्क्रिनशॉट तुम्ही पाहू शकता.


यात तुम्हाला Install WordPress हा पर्याय सापडेल. यात तुमचे डोमेन निवडून वर्डप्रेस इन्स्टॉल करा. यात तुम्हाला वर्डप्रेस कुठे इन्स्टॉल करायचा याचा पाथ विचारला जाईल. तिथे काहीच न टाकता वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे आहे. अधिक माहितीसाठी स्क्रिनशॉट तपासा. यानंतर तुम्हाला तुमच्या वर्डप्रेसच्या लॉगिन डिटेल्स मिळतील.



अशा प्रकारे तुम्ही फक्त १० मिनटात cPanel द्वारे वर्डप्रेस इन्स्टॉल करू शकता.

काही शंका असल्यास कमेंट करा. अपला भाउ आहे ना प्रोब्लेम स्वल करयला तर मग शेर करा अपल्या लंगोटी  मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद !




बोला मि पन करु शकतो